संग्रह - विषय : संपादकीय

संपादकीय

लेखक - संपादक

आपल्या सभोवताली विलक्षण वेगाने इतक्या काही घटना घडत आहेत की सुजाण व संवेदनशील माणसाला हतबुद्ध होण्याशिवाय पर्यायच उरू नये. रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या प्रकरणाचे धागेदोरे उलगडू लागतात न लागतात, तेव्हढ्यात जे एन यु घडते. तेथील एका छोट्या घटनेचे निमित्त करून देशातील ह्या अग्रगण्य शिक्षणसंस्थेला देशद्रोह्यांचा अड्डा म्हणून बदनाम करण्यात येते. तेथे नेमके काय घडले हे चित्र …
पुढे वाचा संपादकीय

संपादकीय – जानेवारी २०१६

लेखक - संपादक

धर्म आणि विवेकवाद ह्यातील नाते हा बहुधा ह्या शतकातील कळीचा मुद्दा असणार आहे. भारतातच नव्हे तर जगभरात धार्मिक मूलतत्त्ववाद दहशत-वादाच्या रूपाने डोके वर काढताना दिसत आहे. झेंड्यांच्या ह्या लढाईत कोणत्याही धर्माचे प्राणतत्त्व असणारी मूल्ये मात्र सर्रास पायदळी तुडवली जाताना दिसतात. भारतात दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी ह्यांच्या झालेल्या हत्या, बांगलादेशमध्ये निरीश्वरवादी ब्लॉग लेखकांचे नेमाने पडणारे खून, …
पुढे वाचा संपादकीय – जानेवारी २०१६

संपादकीय – डिसेंबर २०१५

लेखक - संपादक

आजचा सुधारक चा हा नवा अंक आपल्यासमोर सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. त्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधण्याची संधी मी घेत आहे. मराठीत नियतकालिकांची कमतरता नाही. त्यांपैकी वैचारिक नियतकालिकांची स्थिती मात्र गेल्या अनेक वर्षांपासून चिंताजनक म्हणावी अशी आहे व ती दिवसेंदिवस ढासळताना दिसते आहे. मुळात मराठी भाषेतील व्यवहारालाच ओहोटी लागली आहे. वैयक्तिक संवादापासून गहन …
पुढे वाचा संपादकीय – डिसेंबर २०१५