संग्रह - विषय : संपादकीय

संपादकीय – ऑगस्ट २०१६

लेखक - उत्पल व. बा.

‘आजचा सुधारक’चा ‘विचारभिन्नता विशेषांक’ वाचकांसमोर ठेवताना आम्हांला आनंद होतो आहे. तात्त्विक दृष्टिकोनापासून ते रोजच्या जगण्यापर्यंत आपल्याला विचारभिन्नतेला सामोरं जावंच लागतं. या भिन्नतेला बरोबर घेऊनच आपण आपल्या जगण्याची चौकट आखत असतो. विशेषतः राजकीय-सामाजिक संदर्भात प्रामुख्याने भारतीय समाजाचा विचार करत असताना आज जे चित्र समोर दिसत आहे त्यावर साधक-बाधक चर्चा करण्यासाठी एक विशेषांक काढावा अशी कल्पना पुढे …
पुढे वाचा संपादकीय – ऑगस्ट २०१६

संपादकीय – मे २०१६

लेखक - संपादक

दिवस चर्चांचे आहेत. शेकडो माध्यमांतून हजारो विषयांवर चर्चा झडत आहेत व लाखो लोक त्यांत हिरीरीने भाग घेतानाही दिसत आहेत.  पण त्यातील बहुतेक चर्चा त्याच त्या रिंगणात अडकल्याचे आपल्याला जाणवते. दुष्काळासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर बोलतानाही मुळात अवर्षण आणि दुष्काळ यांचा संबंध, माती व पाण्याचे नियोजन, समाजातील विविध घटकांचे परस्परसहकार्य व समन्वयन, पीकपद्धतीत बदल अशा महत्त्वाच्या मुद्द्यांकडे चर्चा …
पुढे वाचा संपादकीय – मे २०१६

संपादकीय

लेखक - संपादक

आज देशभरात सर्वच प्रश्नांवर ध्रुवीकरणाची भूमिका घेतली जाते आहे असे आपल्याला दिसते. तुम्ही एकतर देशप्रेमी आहात किंवा देशद्रोही (देशप्रेमाची व्याख्या आम्ही करू ती!) त्याविरोधात जे आवाज उठत आहेत तेही बव्हंशी प्रतिक्रियेच्या स्वरूपाचे आहेत, किंवा तेही वेगळ्या अर्थाने ध्रुवीकरणाचीच कास धरणारे आहेत. त्यामुळे भारतात एकतर हिंदुराष्ट्राचे समर्थक आहेत किंवा आंबेडकरवाद व मार्क्सवादाच्या समन्वयाचे समर्थक, असे चित्र …
पुढे वाचा संपादकीय