संग्रह - विषय : श्रद्धा-अंधश्रद्धा

प्रतिसाद ध्यान-मीमांसा

लेखक - उल्हास जाजू

आपल्या लेखनात डॉ. रवीन्द्र टोणगावकरांनी साक्षात्काराची वैज्ञानिक विश्लेषणात्मक बाजू मांडताना खालील विधाने केली आहेत: ‘‘ध्यानावस्थेत देवांच्या विचाराचा कैफ चढल्यामुळे किंवा त्या विचारांनी आलेली उन्मादावस्था, झिंग (God Intoxication) या अवस्थेत स्वतःच्या अंतर्मनातून आलेले जे विचार असतात, त्यांनाच अंतिमसत्य मानून, त्यावर भाबडा विश्वास ठेवून, त्यांना साक्षात्कार किंवा दैवी संदेश म्हटले जाते.’’ ‘‘ध्यानधारणा, योगाभ्यास, आर्ट ऑफ लिव्हिंग, विपश्यना, …
पुढे वाचा प्रतिसाद ध्यान-मीमांसा

अजून एका पुरोगामी विचारवंताची हत्या

लेखक - प्रभाकर नानावटी

कर्नाटकातील हंपी विश्वविद्यालयाचे माजी उपकुलगुरू, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची धारवाड येथील त्यांच्या राहत्या घरी 30 ऑगस्ट 2015 रोजी सकाळी 8.40 वाजता 2 अज्ञात इसमांकडून गोळी घालून हत्या करण्यात आली. कुठल्याही उपचारापूर्वीच त्यांचा जीव गेला होता. मृत्यु समयी त्यांचे वय 77 वर्षाचे होते. डॉ. एम. एम. कलबुर्गी हे ख्यातनाम साहित्य संशोधक, विमर्शक व जुन्या कन्नड …
पुढे वाचा अजून एका पुरोगामी विचारवंताची हत्या

मेंदू प्रदूषण….

लेखक - य. ना. वालावलकर

“दूषित करणे” म्हणजे बिघडविणे, वापरण्यास अयोग्य बनविणे. “प्र” उपसर्ग प्रकर्ष, आधिक्य (अधिक प्रमाण) दर्शवितो. यावरून प्रदूषण म्हणजे मोठ्या प्रमाणात बिघडविण्याची क्रिया. जलप्रदूषण, वायुप्रदूषण, नदीप्रदूषण, भूमीप्रदूषण इत्यादि शब्द सुपरिचित आहेत.”मेंदुप्रदूषण” हा शब्द तसा प्रचलित झालेला नाही. पण त्याचा अर्थ स्वयंस्पष्ट आहे. इंग्रजीत ब्रेन वॉशिंग असा शब्द आहे. त्याचे मराठीकरण मेंदूची धुलाई असे करतात. परंतु धुतल्यामुळे वस्तू …
पुढे वाचा मेंदू प्रदूषण….