संग्रह - विषय : विवेक विचार

पत्रसंवाद

लेखक - मिलिंद सोनटक्के/ कुणालशिरसाट

प्रिय मिलिंद, कसा आहेस? आज फार अस्वस्थ व्हायला झालं म्हणून तुझ्याशी बोलावस वाटलं… काल कर्नाटकात डॉ.कलबुर्गी सरांचा खून केला दोघाजणांनी सकाळीच. अगदी डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांना मारलं ना तसच… काही लोक आता त्यांना बदनाम करणारे मेसेज फिरवत आहेत. तुला खर वाटेल त्यांनी संगितलेसं… डॉ. कलबुर्गी हे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक तर होते पण …
पुढे वाचा पत्रसंवाद

सूफी परंपरा

लेखक - राम पुनियानी

वर्तमान काळात धार्मिक समूहभानाचा उपयोग राजकीय उद्देश साध्य करण्यासाठी केला जात आहे. मग मुद्दा दहशतवादी हिंसेचा असो वा संकीर्ण राष्ट्रवादाचा, जगाच्या सर्व भागांमध्ये धर्माच्या मुखवट्यांआडून राजकारण केले जाते. काही वर्षांपूर्वीपर्यंत धर्माला राजकारणापासून वेगळे करण्याच्या, ठेवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला जात होता. पण आता अगदी उलट झाले आहे. धर्म आणि राजकारणाची सरमिसळ वाढतच गेली. या संदर्भात दक्षिण …
पुढे वाचा सूफी परंपरा

विकास साधू या विवेकानं!

लेखक - माधव गाडगीळ

विकास आज देशाच्या राजकारणात, अर्थकारणात, समाजकारणात विकास हा कळीचा मुद्दा बनला आहे. भरघोस बहुमतानं निवडून आल्यावर घेतलेल्या पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते: ‘सरकार विकासाचं जनांदोलन उभारेल.’ खूष झालो. विचार केला की, आधीच्या सरकारनं विपर्यास केलेल्या आमच्या पश्‍चिम घाट परिसरतज्ज्ञ गटाच्या शिफारशींना आता न्याय दिला जाईल, कारण हा अहवाल म्हणजे सर्व सह्यप्रदेशात विकासाचं जनांदोलन …
पुढे वाचा विकास साधू या विवेकानं!