संग्रह - विषय : युवा

‘केस तर केस – भीमजयंतीला वाजणार २४ बेस’

लेखक - सुरेश सावंत

१४ एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा दिवस. मध्यरात्रीपासूनच शुभेच्छांचे संदेश व्हॉट्सअपवर यायला सुरुवात झाली. त्यातला हा एकः ‘केस तर केस-भीमजयंतीला वाजणार २४ बेस’ या ओळी व खाली स्पीकर्सचे एकावर एक थर असलेला फोटो. पाठवणाऱ्याला लिहिलेः ‘मला हे मान्य नाही. आपण कायदा पाळायला हवा. इतरांना आपला त्रास होता कामा नये.’ त्याचे उत्तर आलेः ‘मलाही तसेच वाटते. …
पुढे वाचा ‘केस तर केस – भीमजयंतीला वाजणार २४ बेस’

गूगल आपल्याला मठ्ठ तर करत नाही ना?

लेखक - प्रभाकर नानावटी

काही तुरळक अपवाद वगळता, एका निरीक्षणानुसार आजच्या तरुण पिढीच्या मेंदूचा बराचसा भाग ईमेल्स, ट्वीटर्स, चॅट्स, स्टेटस् अपडेट्स इत्यादींनी व्यापलेला असल्यामुळे बहुतेक वेळा त्यांच्यात एकाग्रतेचा अभाव असतो व चित्त विचलित झालेले असते. अमेरिकेतील कॉलेजमधील 80 टक्के विद्यार्थी मॅसेजेस, फेसबुक, न्यूजफीड व इतर गोष्टी ताशी एकदा तरी, 10 टक्के ताशी सहा वेळा तरी वापरत असतात. व इतरांच्या …
पुढे वाचा गूगल आपल्याला मठ्ठ तर करत नाही ना?

आजचं भारतीय तारुण्य नेमकं आहे कसं?

लेखक - चिन्मय लेले

‘भारत हा तरुणांचा देश आहे’, हे घिसंपिटं वाक्य ऐकून आपण पुरते कंटाळलो आहोत. इथं घरात चॅनल बदलण्याची सत्ता नाही, त्यासाठी बंड पुकारावं लागतं आणि या देशातली व्यवस्था, समाज, तरुण बदलतील अशी भाषणं केली जातात, असं आपल्याला वाटणं साहजिक आहे. मात्र, ‘मार्केट’ या देशातल्या तारुण्याकडे असं पाहत नाही. बाजारपेठेचे अभ्यासक शोधतच असतात, या देशातल्या तारुण्याचं व्यक्तिमत्त्व. …
पुढे वाचा आजचं भारतीय तारुण्य नेमकं आहे कसं?