संग्रह - विषय : युवा

आत्मशोधार्थ शिक्षण

लेखक - बालकृष्ण पिशुपती

  शिक्षण स्वतःचा शोध व समृद्धी ह्यांसाठी तसेच जनसामान्यांच्या हितासाठी कसे उपयोजित करता येईल, विद्याशाखांमधील कृत्रिम भिंती कशा तोडता येतील, शिक्षणक्षेत्रात प्रेरणा व स्वातंत्र्य ह्यांचे महत्त्व काय, अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा परामर्श घेत व त्याला स्वानुभव जोडत आंतरराष्ट्रीय एका युवा विख्यात शास्त्रज्ञाने मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात केलेल्या भाषणाचा संपादित अनुवाद. —————————————————————————– तुमच्यापैकी बहुतेकांना ठाऊक असेल …
पुढे वाचा आत्मशोधार्थ शिक्षण

विवाहाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’!

लेखक - मंगला सामंत

अलीकडे एक चर्चा अचानक उफाळून आली, ती अशी की, विवाह अंतर्गत पतीची शरीरसंबंधाबाबत असणारी पत्नीवरची जबरदस्ती हा ‘बलात्कार’ समजायचा का? मात्र पतीच्या या जबरदस्तीच्या मुद्दय़ावर बोलण्यापूर्वी, पहिल्या प्रथम विवाहाविषयी थोडं प्राथमिक जाणून घ्यायला हवं. स्त्री-पुरुषांना एकमेकांच्या साथीने आणि पुढे आधाराने सहजीवन जगता यावे, म्हणून तरुणपणातच त्यासाठी जी निष्ठेची आणि प्रेमाची बैठक घातली जाते, तिला ‘लग्न’ …
पुढे वाचा विवाहाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’!

नेटिझन्स इतक्या उर्मटपणाने का वागतात?

लेखक - प्रभाकर नानावटी

संगणक (यात संगणकाशी संबंधित मोबाइल फोन, इंटरनेट, लॅपटॉप, वाय फाय, नेटबँकिंग, मोबाइल बँकिंग व इतर सर्व माहिती तंत्रज्ञान सुविधांचा समावेश आहे.) माणसांना चांगली माणसं बनण्यासाठी मदत करतात, हे संगणक क्षेत्रातील एका तज्ञाचे विधान आहे. परंतु निदान ब्लॉगोस्फेरमधील अनुभवावरून तरी नेटवरील माणसं उदात्त, शहाणे, संवेदनशील झाले आहेत, याबद्दल शंका घ्यावीशी वाटते. आपण कल्पनाही करू शकणार नाही …
पुढे वाचा नेटिझन्स इतक्या उर्मटपणाने का वागतात?