संग्रह - विषय : चिकित्सा

कलाकृती आणि समाज

लेखक - डॉ. राजीव जोशी

  मी ललित किंवा तत्सम साहित्य क्वचितच वाचले आहे. श्री भालचंद्र नेमाडेंना पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या लेखनाच्या साहित्यिक आणि सामाजिक मूल्यांची अधिक चर्चा होणार आहे. कला मूल्यांपेक्षा मी कलाकृतीच्या सामाजिक परिमाणाला अधिक (कदाचित अवास्तव) महत्त्व देतो. परंतु प्रत्यक्ष लिखाण न वाचता (आणि तसे परिश्रम न घेता) काही एक सर्वसाधारण स्वरुपाचे विचार व्यक्त करता येतात. नेमांडेंचा स्वतःचा दृष्टिकोन स्पष्ट आहे – “मी परंपरेचे जे …
पुढे वाचा कलाकृती आणि समाज

‘पब्लिक’ विचारवंतांचे महत्त्व : रोमिला थापरांच्या तोंडून

लेखक - प्रफुल्ल बिडवई

आणीबाणीच्या काळात भाजपचे लाल कृष्ण अडवानी माध्यमांबाबत म्हणाले, ‘‘त्यांना वाकायला सांगितले तर ते रांगू लागले”. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानल्या गेलेल्या माध्यमांनी आपले स्वातंत्र्य आणि सचोटी कसे घालवले, यावरचे अडवानींचे भाष्य भाजपेतरांना आणि विचारवंतांनाही कौतुकास्पद वाटले होते. आज माध्यमेच नव्हे तर शिक्षण, सांस्कृतिक व्यवहार, आरोग्यसेवा, विधिव्यवस्था वगैरे क्षेत्रांतील मान्यवरही राष्ट्रीय स्वयंसेवक संघापुढे रांगू लागले आहेत; आणि …
पुढे वाचा ‘पब्लिक’ विचारवंतांचे महत्त्व : रोमिला थापरांच्या तोंडून

आत्मा आणि मानवी मेंदू

लेखक - य. ना. वालावलकर

इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्य: परं मन:। मनसस्तु परा बुद्धि: यो बुद्धे: परतस्तु स:। (गीता अ. ३ श्लोक. ४२) गीतेतील या श्लोकात इंद्रिये (ज्ञानेंद्रिये+कर्मेंद्रिये), मन आणि बुद्धी यांचा उल्लेख आहे. मात्र बुद्धीचे तसेच मनाचेही अधिष्ठान असलेल्या मेंदूचा उल्लेख नाही. संपूर्ण गीतेत मेंदू अथवा त्या अर्थाचा अन्य कोणताही शब्द नाही. संस्कृत-मराठी “गीर्वाणलघुकोशा”त मेंदू हा शब्द नाही. पुढे शोध घेता …
पुढे वाचा आत्मा आणि मानवी मेंदू