संग्रह - विषय : चिकित्सा

भारतीय चर्चापद्धती : स्वरूप

लेखक - श्रीनिवास हेमाडे

‘वाद’ हा मराठी शब्द विविध अर्थांनी वापरला जातो. एक : इंग्लिशमधील ‘ism’ म्हणजे तत्त्वज्ञान, व्यवस्था किंवा विशेषतः राजकीय विचारसरणी हा अर्थ; जसे की मार्क्सवाद. दोन : भांडण आणि तीन : वैदिक परिभाषेत विधी-अर्थवाद. (वेदवाक्यांचे विधी, मंत्र, नामधेय, निषेध आणि अर्थवाद असे अर्थदृष्ट्या पाच विभाग होतात. वेदाचा अर्थ या पाचही विभागांचा एकत्र विचार करूनच ठरतो. कारण ‘प्रत्येक वेदवाक्याला …
पुढे वाचा भारतीय चर्चापद्धती : स्वरूप

विवेकी विचारांची मुस्कटदाबी

लेखक - प्रभाकर नानावटी

पुरोगामी विचारांसाठी वाहिलेले दि न्यू रिपब्लिक हे अमेरिकन मासिक 1915 पासून प्रसिद्ध होत आहे. त्याच्या पहिल्या अंकात या प्रकारच्या मासिकाची समाजाला का गरज आहे याबद्दल संपादकाने या काळात आपल्याला सर्वनाशापासून वाचवण्याची, आपल्या दुःखावर फुंकर घलण्याची, आपल्याला संरक्षण देणारी शक्ती फक्त सुस्पष्ट विचारांना आहे असा उल्लेख केला होता. खरे पाहता यात अतिशयोक्ती नाही. काही जणांना स्पष्ट …
पुढे वाचा विवेकी विचारांची मुस्कटदाबी

ठाम आणि निश्चित भूमिका असणारे लेखन

लेखक - नागनाथ कोत्तापल्ले

इंग्रजी राजवटीच्या आगमनानंतर भारतीय समाजजीवन क्रमाक्रमाने बदलू लागले. पऱ्यायाने एकोणिसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकापासून महाराष्ट्रातही बदल सुरू झाले. यातील महत्वाचा बदल म्हणजे भारतीय माणूस मध्ययुगीन सरंजामी मानसिकतेकडून आधुनिकतेकडे येऊ लागला. त्याचे कारणही यंत्रयुगाचे आगमन आणि अर्थव्यवस्थेने घेतलेले भांडवलदारी वळण हे होते. परिणामी आतापर्यंत मूक असणारे समाजघटक जाती घटक मुखर होऊ लागले. ते व्यवस्थेला प्रश्न विचारू लागले. …
पुढे वाचा ठाम आणि निश्चित भूमिका असणारे लेखन