संग्रह - विषय : चळवळ

मराठी नियतकालिकांची हतबलता

लेखक - राम जगताप

सलग २० हून अधिक दिवस पुण्याच्या ‘एफटीआय’मधील विद्यार्थ्यांचे नव्या संचालकांविरोधातले आंदोलन तग धरून आहे. त्यातून इतर काही निष्पन्न होईल न होईल; पण एक गोष्ट सिद्ध व्हायला हरकत नाही की, आपल्यावरील अन्यायाला आंदोलनाच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे दिवस अजूनही पूर्णपणे इतिहासजमा झालेले नाहीत; पण ही मिणमिणती पणती म्हणावी, तशा प्रकारची अंधूक आशादायक घटना आहे. कारण महाराष्ट्रातल्या सामाजिक …
पुढे वाचा मराठी नियतकालिकांची हतबलता

जातीय अत्याचारः प्रतिबंध आणि निर्मूलन

लेखक - गौतमीपुत्र कांबळे

हा विषय केवळ बौद्धिक चर्चेचा किंवा सैद्धांतिक मांडणीचा नाही. तर तो जातीय अत्याचाराच्या मूळ कारणांचा आणि निमित्त कारणांचा शोध घेऊन त्या दोन्ही कारणांचे निर्मूलन तात्त्विक आणि थेट वर्तनव्यवहार करण्याच्या प्रामाणिक प्रयत्नाशी निगडित आहे. जातीय अत्याचार निर्मूलनाची जाती निर्मूलन ही पूर्व अट आहे. महाराष्ट्रामध्ये जातीय अत्याचार दिवसेंदिवस केवळ वाढताहेत नव्हे, तर त्याची भीषणता आणि क्रूरताही वाढत …
पुढे वाचा जातीय अत्याचारः प्रतिबंध आणि निर्मूलन

‘केस तर केस – भीमजयंतीला वाजणार २४ बेस’

लेखक - सुरेश सावंत

१४ एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा दिवस. मध्यरात्रीपासूनच शुभेच्छांचे संदेश व्हॉट्सअपवर यायला सुरुवात झाली. त्यातला हा एकः ‘केस तर केस-भीमजयंतीला वाजणार २४ बेस’ या ओळी व खाली स्पीकर्सचे एकावर एक थर असलेला फोटो. पाठवणाऱ्याला लिहिलेः ‘मला हे मान्य नाही. आपण कायदा पाळायला हवा. इतरांना आपला त्रास होता कामा नये.’ त्याचे उत्तर आलेः ‘मलाही तसेच वाटते. …
पुढे वाचा ‘केस तर केस – भीमजयंतीला वाजणार २४ बेस’