संग्रह - विषय : कविता

विळा लावणारा जन्म

लेखक - वैभव देशमुख

मांडवावर पसरलेली वेल बुडापासून कापून घ्यावी विळ्यानं सपकन तसा आईवडिलांच्या मुलगा होण्याच्या प्रार्थनेला विळा लावणारा तिचा जन्म तिचा जन्म तिच्या आईच्या स्तनांना दुधाऐवजी भय फोडणारा …   ती जन्मली अन् तिच्या आईच्या पाठीवर मागच्या बाळंतपणातले काळेनिळे वळ पुन्हा जिवंत झाले   ती जन्मली अन् कोपऱ्यात निपचित पडलेल्या हिंस्र दुःखाने पुन्हा डोळे उघडले … (पूर्वप्रसिद्धी : …
पुढे वाचा विळा लावणारा जन्म

भाबडी परिभाषा

लेखक - सुजाता

‘जिथून सुरू होतं दुसऱ्याचं नाक तिथेच माझ्या स्वातंत्र्याचा अंत होतो’   अशा तऱ्हेने स्वातंत्र्याला परिभाषित करताना स्त्रियांचा विसर पडला की त्यांच्यापाशी नाकाहून अधिक उन्नत जे काही आहे त्याला तुम्ही स्वतःच्या स्वातंत्र्यात सामील करून घेतलं?   ईमेल: chokherbali78@gmail.com मूळ हिंदी कविता समावर्तन फेब्रुवारी २०१६ च्या अंकात प्रकाशित

वात्सल्याचे तपशील

लेखक - केशव सखाराम देशमुख

एकदा पाणभिजला ऋतु येऊन गेला म्हणजे शिवारावर श्वासांची लागवड सुरू होते पाखरे ओठांच्या काठांवर झाडांची हिरवी पाने ठेवतात पाखरांकडून खुलेपणाने कोरसपमध्ये सूर्याचे गाणे गायिले जाते सगळा आसमंत गणगोत होऊन माणसांच्या भेटीला येतो वासरांच्या वात्सल्याचे तपशील गायींच्या डोळ्यांत; डोळाभर झालेले असतात एवढेच शील : झाडांचे, शिवारांचे, पाखरांचे. (चालणारे अनवाणी पाय  ह्या काव्यसंग्रहातून , पद्मगंधा प्रकाशन )